मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Solution
कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या आश्रयाला का आलो, याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दांत मांडले आहे. त्याच वेळी 'साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते,' हा ठोस विचारही मांडला आहे.
कवी म्हणतात- शब्दांनी मला आयुष्यभर सावरले. जगण्याची उमेद दिली. आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कैक वेळा शब्दांच्या कुशीत शिरलो. स्वत:चा बचाव केला. दुःखाचे विष मी प्यायलो, पण ते पचवले शब्दांनी ! मी शब्दांविषयी कृतज्ञ आहे.
'विष मी प्यालो नि शब्दांनी पचविले' या विधानातून कवींची शब्दांबद्दलची कृतार्थता व्यक्त होते. 'शब्द आमुच्या जिवाचे जीवन !' ही संत तुकारामांच्या उक्तीची आठवण व्हावी, असे सामर्थ्य या ओळीत आहे. आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त झाला आहे.