Maharashtra State BoardHSC Arts 12th Board Exam
Advertisement Remove all ads

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा. - Marathi

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.

Advertisement Remove all ads

Solution

बदलत्या काळात उत्पादनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संस्था/उत्पादन/सेवा यांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा वेळी ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवण्यासाठी उत्पादकांकडून माहितीपत्रकाचा वापर वाढला आहे. माहितीपत्रक कुठल्याही संस्थेचा/उत्पादनाचा/सेवेचा वैशिष्ट्यपूर्णरीत्या परिचय करून देत असते. जनमत आकर्षित करण्यासाठी एकप्रकारचे लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. कमी वेळात, कमी खर्चात विश्वासार्ह माहिती ग्राहकाकडे माहितीपत्रकाच्या माध्यमातून पोहोचवता येते. सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते करोडोंची उलाढाल करणाऱ्या व्यापाच्या पर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासते. पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहन, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड साड्या अशा सर्वच बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, पतपेढ्या, पर्यटन संस्था इत्यादींमध्येही समुदाय आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. तसेच, कला, संगीत, विविध अभ्यासक्रम, विविध बांधकामे, गृहसंकुल इत्यादी क्षेत्रांतही माहितीपत्रक महत्त्वाची भूमिका निभावत असते. ज्या ज्या क्षेत्रात लोकआकर्षणाची गरज असते तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. माहितीपत्रक हे विशिष्ट संस्था/उत्पादन/सेवा यांचा चेहरा असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Concept: गद्य (Prose) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 4.02 माहि तीपत्रक
कृती | Q 1 | Page 97
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×