Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
- अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले.
- गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात.
- अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला.
- नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला.
- नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या भिंतींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात.
Concept: भारतातील दृक्कला परंपरा
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads