'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली', हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Solution
लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे शिकारीला जाताना वाघिणीनं आपल्या पिल्लांना दाट झुडपात लपवून ठेवलं होतं. ती शिकारीसाठी रात्रभर भटकंती करत असतानाही तिचं मन मात्र पिल्लांकडे लागलेलं होतं, म्हणूनच तिने जागेवर परत येताच लगेच पिल्लांना हाक मारली. रात्रभर पायपीट करून थकली भागली असली, तरी त्या त्रासाचा राग तिनं पिल्लांवर काढला नाही. उलट, पिल्लांनी अंगावर उड्या मारल्या, दंगामस्ती करून त्रास दिला तरी ती फारशी रागावली नाही. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्या सोबत असावीत याचीही तिनं काळजी घेतली होती. या सगळ्या घटनांवरून हे स्पष्ट होते, की वाघिणीला पिल्लांच्या सुरक्षेची खूप काळजी होती. ती कुठेही गेली तरी तिचं मन नेहमी पिल्लांकडे एकवटलेलं होतं, पिल्लांसाठी कितीही त्रास सोसण्याची तिची तयारी होती. पिल्लांना व्यवस्थित खाऊपिऊ घालण्याबाबत ती सावधान होती. एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्यतत्पर आई, आपल्या बाळाचं जसं संगोपन करते, तसंच ती आपल्या पिल्लांचं संगोपन करत होती. त्यामुळेच, लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.