कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
Solution
या कथेतील एक रुपयाच्या नोटा चा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे एक रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री साडेबारा-एक नंतर कथा निवेदन, मुक्ता व अनू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परिवहन निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडेदांपत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या एक रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनूने सर्व हकिगत सांगितल्यावर एका नऊ-दहा वर्षांच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती, हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनू टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते, म्हणून 'शोध' हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे.