कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
Solution
अनू ही कथेची नायिका आहे. ती चारचौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तर्हेवाईक, विक्षिप्त वाटेल. पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही, आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो, तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वत:च्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे. म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो. म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वत:ला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अनू स्वत:साठी घडवत होती.