Advertisement Remove all ads

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गं मनी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पानी. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

4. काव्यसाैंदर्य. (२)

'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

1.

2.

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

3. आणखी थोडे खोदलेस; तर पाणी हाती लागेल. धीर न सोडता उमेदीने पुढे गेल्यास प्रत्येक वेळी अपयशच हाती येईल, असे नसते.

4. कवयित्री आसावरी काकडे 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून जीवनात नेहमी आशावादी राहिले पाहिजे असा विचार मांडतात. ध्येयपूर्तीसाठी संयम, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाणावा. उमेदीने कष्ट करत जगावे हा संदेश त्यांनी या कवितेतून दिला आहे.
आयुष्यात येणाऱ्या संकटांना सकारात्मकतेने तोंड देणे महत्त्वाचे असते. येणाऱ्या अडचणींनी न डगमगता, जिद्दीने, उमेदीने कार्यरत राहणे व चांगुलपणावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. आशा न सोडता सतत प्रयत्न केले, तर यश आपलेच असते. आपण जिथे प्रयत्न करणे थांबवतो, तिथूनच आणखी थोडेसे पुढे गेले, की मग यशाचा मार्ग खुला होतो; पण त्यासाठी उमेदीने जगायला हवे. असे जगण्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती आणि कष्ट यांची गरज असते. असा विचार कवयित्री या ओळींद्वारे मांडू पाहत आहे.

Concept: पद्य [इयत्ता १० वी]
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 15.1 खोद आणखी थोडेस
कृती क्रमांक १ | Q 2. (अ)
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×