खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रामाणिकपणाचे फळ
Solution
प्रामाणिकपणाचे फळ |
सकाळी राम पेपर टाकण्याचे काम करत होता. घरच्या गरिबीमुळे रामला शाळेची फी भरणे अशक्य होते. त्यामुळे, तो पेपर टाकणे, दूध पोहोचवणे अशी कामे करून आपले व आपल्या आईचे पोट भरण्याचा प्रयत्न करत असे. त्याचे स्वप्न होते, की आपण शाळेत जावे, खूप शिकावे, मोठा माणूस व्हावे असाच विचार करत असताना त्याचा पाय कुठल्याशा वस्तूवर तरी पडला. त्याने खाली वाकून पाहिले, तर ते एक पैशांचे पाकीट होते. झटकन वाकून त्याने ते पाकीट उचलले, कुणाचे आहे का असे विचारण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले; मात्र सकाळची वेळ असल्यामुळे रस्ता निर्मनुष्य होता. त्याने पाकिटात काय आहे हे पाहण्यासाठी ते उघडण्याचा विचार केला; मात्र त्याला आईचे शब्द आठवले, 'जे आपले नाही ते घेण्याचा विचार करणे म्हणजे चोरीच.' त्याने तडक पोलीस स्टेशन गाठले व ते पैशांचे पाकीट पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. संध्याकाळच्या वेळेस राम आईला घरकामात मदत करत असताना एक मध्यमवयीन गृहस्थ त्याच्या घरी आले. पेपर टाकणारा मुलगा येथेच राहतो का? अशी विचारणा केल्यावर राजू घरातून बाहेर आला. त्यांनी रामला पैशांच्या पाकिटाबद्दल विचारले. त्यांनी खात्री पटताच रामचे आभार मानले व खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून रामला बक्षिस देण्याचा प्रयत्न केला. रामने ते बक्षिस नम्रपणे नाकारले. त्या गृहस्थांनी रामच्या शाळेची चौकशी करताच त्यांना समजले, की गरिबीमुळे राम शाळेत जात नाही. त्यांनी रामला जवळ घेतले आणि म्हटले, “काळजी करू नकोस. उद्यापासून तुझी सारी कामे बंद. तुझ्या शाळेचा खर्च मी करणार. तू फक्त अभ्यास कर आणि मोठा हो.” हे ऐकून रामच्या डोळयांत आनंदाश्रू उभे राहिले. त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ त्याला मिळाले होते. तात्पर्य: प्रामाणिकपणा हाच खरा दागिना. |