खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पळसाला पाने तीनच
Solution
पळसाला पाने तीनच |
विश्वनाथ नावाच्या एक व्यापारी होता. त्याने आयुष्यभर खूप मेहनतीने संपत्ती मिळवली. म्हातारपणात मात्र कोणीही नातेवाईक नसल्याने या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न त्या व्यापाऱ्यास पडला. एवढी संपत्ती एखाद्या योग्य माणसाच्या हाती सोपवावी असा निश्चय त्याने केला. त्याकरता एका नि:स्वार्थी माणसाचा शोध घेत तो भटकू लागला. विश्वनाथला रस्त्यात एक व्यापारी भेटला. त्या व्यापाऱ्याला त्याने आपली समस्या सांगितली. व्यापारी लगेचच विश्वनाथशी गोड बोलू लागला. आपण किती मोठे समाजसेवक आहोत आणि आपण किती लोकांना मदत केली आहे, याचा पाढा तो विश्वनाथसमोर वाचू लागला. विश्वनाथला व्यापाऱ्याचा हेतू लक्षात आला. त्याने आपला मार्ग बदलत व्यापाऱ्यापासून आपला पाठलाग सोडवला. विश्वनाथला पुढे एक जमीनदार भेटला. विश्वनाथ बाहेर पडण्याचे कारण कळताच जमीनदारही आपल्याकडे असलेल्या जमिनींवर उगणारे धान्य आपण नि:स्वार्थीपणे दान करतो असे सांगू लागला. ऐशोआरामाचे जीवन जगणारा हा जमीनदार स्वार्थापोटी विश्वनाथची हाजी-हाजी करू लागला. त्याचे लक्षण ओळखून विश्वनाथ त्याच्यापासून दूर झाले. विश्वनाथच्या मनात आले की, आपण एखाद्या साध्या माणसाला भेटावे. तेवढ्यात त्यांना समोरच्या देवळात देवपूजा करणारा पुजारी दिसला. त्याला पाहून विश्वनाथ खुलले. या पुजाऱ्याला स्वार्थाचा स्पर्शही नसावा असे मानून विश्वनाथ त्याच्याजवळ गेले. पुजाऱ्याला विश्वनाथचा हेतू कळताच पुजाऱ्याने मंदिरात येणाऱ्याना आपण किती मदत करतो ते सांगायला सुरुवात केली. आपण किती नि:स्वार्थी आहोत हे दर्शवण्याचा पुजाऱ्याचा प्रयत्न विश्वनाथच्या नजरेतून सुटला नाही. पुजाऱ्याचीही ही स्थिती पाहून मात्र विश्वनाथला 'पळसाला पाने तीनच' ही म्हण खऱ्या अर्थाने पटली. आपली सारी संपत्ती अनाथाश्रमास दान करून विश्वनाथ तेथून निघाला. तात्पर्य: सर्व ठिकाणी परिस्थिती सारखीच असते. |