खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
Solution
कष्टाची गोड फळे |
विश्वनाथ नावाचा मोठा शेतकरी रामगड गावी आपल्या तीन मुलांसह राहत होता. म्हातारपणामुळे विश्वनाथ थकला होता. त्या वयात शेती करणे शक्य नव्हते. त्याची तीन मुले अतिशय आळशी होती. त्यामुळे, मोठी शेती असूनही ती ओसाड पडली होती. विश्वनाथला मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती. एके दिवशी तो खूप आजारी पडला. त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून घेतले आणि तो म्हणाला, “बाळांनो, आता माझ्याकडे फार वेळ नाही. मी तुम्हांला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपल्या शेतात मी खूप धन पुरून ठेवले आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही शेत खोदा आणि मिळालेले धन वाटून घ्या.” एवढे बोलून तो म्हातारा शेतकरी मरण पावला. विश्वनाथच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुलांना शेतात पुरून ठेवलेल्या धनाची आठवण झाली. त्यांनी एक एक करून सारी शेती खोदून काढली. त्यांना धन काही मिळाले नाही. ती मुले निराश झाली. त्यांना समजले, की त्यांच्या वडिलांनी त्यांना फसवले आहे. हताश होऊन बसलेले असताना त्यांचे शेजारी व विश्वनाथचे मित्र राम यांनी त्या मुलांना पाहिले. त्यांनी मुलांना समजावले, की निराश होऊ नका. तुम्ही शेती खोदली आहेच, तर त्यात पेरणी करा. मुलांना तो सल्ला पटला. त्याने शेतीत धान्य पेरले. लवकरच पाऊस पडला. मुलांची शेती बहरून आली. त्यांच्या शेतातील धान्य विकून त्यांना खूप पैसे मिळाले. त्यावेळी राम काकांनी त्या मुलांना परत समजावले. विश्वनाथने शेतात कोणतेही धन पुरले नव्हते, तर तुमच्या कष्टाने तुम्ही ते मिळवावे अशी त्याची इच्छा होती. तुम्ही कष्टाची गोड फळे चाखली आणि तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली. तात्पर्य: मेहनतीने केलेले कोणतेही काम सफळ होते. |