खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
Solution
कोल्ह्याला द्राक्ष आंबट |
एक कोल्हा जंगलात राहत होता. दोन दिवस खायाला न मिळाल्याने भुकेने तळमळत होता. आपल्याला खायला काही मिळेल या शोधात भटकत भटकत तो एका मळयात आला. तो द्राक्षांचा मळा होता. द्राक्षांच्या मांडवाला पिकलेल्या द्राक्षांचे घड लोंबकळत होते. ते द्राक्षांचे घड पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. कोल्हाने उड्या मारून ती द्राक्षे खाण्याचा प्रयत्न केला; मात्र द्राक्षाचे घड खूप उंचावर असल्यामुळे तेथे पोहोचणे त्याच्यासाठी अवघड होते. कोल्हा उड्या मारून द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र त्याची उडी तिथपर्यंत पोहोचत नव्हती. खूप वेळा उड्या मारल्यानंतर तो थकला. मांडवाच्या थोड्या बाजूला जाऊन पुन्हा एकदा त्या द्राक्षांकडे पाहिले आणि म्हणाला, “ही आंबट द्राक्षे ज्याला खायची असतील त्याने खाऊ दे. आपल्याला काही ही आंबट द्राक्षे नकोत.” असे म्हणून आपल्या मनातील निराशा लपवत कोल्हा तेथून निघून गेला. त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही तेव्हा त्याने ती द्राक्षेच आंबट आहेत, असे म्हणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला. खूप लोक असे असतात, की त्यांच्या हाती एखादी चांगली गोष्ट लागली नाही, तर त्या चांगल्या गोष्टीलाच वाईट ठरवून मोकळे होतात. तात्पर्य: स्वत:च्या गोष्टीची शिक्षा नेहमी दुसऱ्या गोष्टीवर थोपवणे. |