खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
बुद्धी आणि ताकदीचा मेळ
Solution
बुद्धी आणि ताकदीचा मेळ |
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली तेव्हा विजापूरच्या बडी बेगमने भर दरबारात आवाहन केले, की जो सरदार शिवाजी महाराजांना कैद करून आणेल त्याला मोठे इनाम दिले जाईल. एक सरदार यासाठी तयार झाला. तो सरदार होता क्रूर, धूर्त अफझल खान! त्याला हरवणे सोपे नव्हते. त्याने मोठ्या सैन्यासह स्वराज्यावर आक्रमण केले. अनेक देवळे पाडली, गावे लुटली, लोकांना मारले. या अत्याचाराने शिवाजी महाराज चिडतील आणि युद्ध करायला मैदानात येतील अशी त्याची अपेक्षा होती. महाराजांनी नेहमीच गनिमी काव्याला म्हणजेच शक्तिपेक्षा युक्तीला महत्त्व दिले. त्यांनी प्रतापगडावरून खानाला आपण घाबरलो असल्याचा निरोप पाठवला व तहाची बोलणी सुरू केली. भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याचे ठिकाण ठरले. या भेटीत खान दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक होते. त्यामुळे, त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून चिलखत, बिचवा, वाघनखे अशा तयारीसह खानाची भेट घेण्याचे ठरवले. आपल्या बुद्धीने खानाला प्रतापगडासारख्या अवघड जागी त्यांनी बोलावून घेतले आणि प्रत्यक्ष भेटीत खानाने दगाफटका करून वार करण्याचा प्रयत्न करताच आपली ताकद पणाला लावून वाघनखे खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला. हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट बनून आलेल्या अफझलखानाला अत्यंत शौर्याने व चतुराईने बुद्धी आणि ताकदीचा मेळ घालून महाराजांनी ठार केले व स्वराज्याचे रक्षण केले. तात्पर्य: ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. |