खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
अति तिथं माती
Solution
अति तिथं माती |
रामगड गावात एक गरीब भिकारी राहत होता. तो दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करी. एके दिवशी त्यास कोणीतरी सुचवले, की इंद्रदेवाची साधना कर, तो प्रसन्न झाला, तर तुझे दारिद्र्य संपेल. भिकाऱ्याने इंद्रदेवाची तपस्या सुरू केली. इंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला. कृपा म्हणून इंद्राने त्यास सुवर्णनाणी देऊ केली. भिकाऱ्याने आपली झोळी पसरली. तेव्हा इंद्राने त्यास इशारा दिला, की झोळीतून नाणे जमिनीवर पडले, तर त्याची माती होईल. भिकाऱ्याने आपली झोळी भरताच इंद्रास थांबवले. झोळीत मावेल तेवढी सुवर्णनाणी घेऊन तो आनंदात घरी गेला. नवीन कपडे, खाऊ घेतले, घर बांधले. गावातले सर्व आश्चर्यचकीत झाले, की हा भिकारी एकाएकी श्रीमंत कसा झाला. त्याच्या एका मित्राने याबाबत त्याला विचारले. भिकाऱ्याने त्याला आपली हकीकत सांगितली. ते ऐकून त्यानेही इंद्राची तपस्या करायला सुरुवात केली. त्याच्या तपस्येने इंद्र प्रसन्न झाला. इंद्राने त्यालाही कृपा म्हणून सुवर्णनाणी देऊ केली. त्याने झोळी पसरली तेव्हा इंद्राने त्यासही नाणे जमिनीवर पडल्यास त्याची माती होईल असा इशारा दिला. झोळी भरू लागताच त्याला हाव सुटली. तो अधिकाधिक सुवर्णनाणी मागत राहिला. ताण येऊन झोळी फाटली. सगळया सुवर्णनाण्यांची जमिनीवर पडताच माती झाली. त्याचक्षणी इंद्रदेवही नाहीसा झाला. अति लोभापायी त्याच्यावर रडायची वेळ आली. तात्पर्य: लालचीपणा नेहमीच वाईट असते. |