खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
Solution
'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे. ।
प्रस्तुत ओवी मध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वत: आस्वादावीशी वाटते, यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. ।
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.