खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा. - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

Advertisement Remove all ads

Solution

मी फुलवलेली बाग

बागेचे सौंदर्य मनावर जादू करत आहे, असे वाटत होते, कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन म्हणजे अतिशय कंटाळवाणा काळ होता; पण मला मात्र या काळात आपली आवड जपण्याची नामी संधीच मिळाली. ती आवड प्रत्यक्षात अवतरली ती आमच्या गॅलरीमध्ये फुलवलेल्या बागेच्या रूपात! आजोबांनी पाठिंबा दिला आणि माझी बागकामाची सुरुवात झाली. आमच्या अडगळीच्या सामानात प्लॉस्टिकचे मोठे ट्रे होते. त्यामध्ये माती भरून घेतली. जवळच एक फूलझाडांची नर्सरी आहे. मी जमवलेल्या पैशांतून आजोबांच्या सोबतीने तेथून काही फूलझाडे विकत आणली. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली या रोपांची मी लागवड केली. त्यांना खतपाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम मला एक विलक्षण आनंद मिळवून देत होते.

बागकामातला माझा उत्साह बघून हळूहळू कुटुंबियांनीही आपले सहकार्य सुरू केले. आई पाणी घालण्याच्या वेळी मदत करू लागली. बाबांनी एक छोटी झारी आणि खुरपे आणून दिले. बागकामासाठी सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दादाने दिला. त्यासाठी आम्ही कोथिंबीर किंवा इतर भाज्यांच्या न वापरलेल्या भागांचा उपयोग खत म्हणून करू लागलो. डाळींचे पाणी, तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी, चहाचा गाळ यांचा वापर खत म्हणून केला. मासे धुतल्यानंतर त्याचे पाणी घातल्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.

चमेली आणि जुही, गुलाब यांसारख्या अनेक फुलांनी बागेला सुशोभित केले होते. रंगीबेरंगी फुलांचे हास्य फुलताना पाहून आयुष्यातील खऱ्या आनंदाची जाणीव झाली. पुढे भाजीपाला लागवड करण्याची इच्छा निर्माण झाली. आजोबांनी मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो घरच्याघरी कसे पिकवायचे ते सांगितले. मेथी पेरली. कोथिंबिरीसाठी धणे फोडून पेरले. मिरची आणि टोमॅटोच्या बिया टाकून ठेवल्या. थोड्याच दिवसांत मेथीची भाजी छानपैकी तयार झाली. ती मेथीची भाजी काढून आईला दिल्यानंतर आणि त्याची भाजी खाल्यानंतर काय आनंद झाला म्हणून सांगू!

झाडांना पाणी देत ​​होतो. बागेत फुलांचा सुगंध होता तर हृदयात आनंदाचा संचार. मिरची, टोमॅटोची रोपे चांगलीच तयार झाली. मेथी पाठोपाठ आम्ही कोथिंबीर जेवणात वापरली. झेंडूची फुले, गुलाबाची फुले नेहमीच्या पूजेसाठी मिळू लागली. एके दिवशी मिरचीच्या रोपांवर पांढऱ्या रंगाची फुले दिसली. आजोबा म्हणाले, “राजे, तुमच्या बागेत मिरच्या येणार बरं का.” मिरच्यांच्या फुलांपासून मिरच्या तयार होण्याचा प्रवास मी रोज न्याहाळत होतो. आई मध्येच चिडून काय सारखं सारखं झाडांना त्रास देतोस, म्हणून ओरडायची. घरातले सारेच जण माझे आणि माझ्या बागेचे कौतुक करत होते. दादाने त्याच्या सोशल मीडियावर माझ्या बागेचे फोटो टाकल्यावर त्याला खूप 'लाइक्स' आल्या. मला या साऱ्यातून एक वेगळेच समाधान मिळाले. आपण काहीतरी नवनिर्मिती शिकलो अशी भावना निर्माण झाली.

Concept: निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन ३ | Q इ. ४.
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×