खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा. - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

Advertisement Remove all ads

Solution

वाचन प्रेरणा दिन

१५ ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून शाळेत साजरा केला जातो. यावर्षी आमच्याकडे त्याचे आयोजन करण्याची जबाबदारी होती. शाळेची सजावट करण्याकरता आम्ही वेगवेगळया सुभाषितांनी फलक सजवले. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कवी रमेश देशपांडे आणि लेखक राहुल पुरोहित यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.

मी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजीचे मनोगत रंगून जाऊन वाचले. आमच्यातल्याच काही विद्यार्थ्यांनी कथा एवढ्या सुंदर सादर केल्या, की आपण ती गोष्ट खरोखर पाहतो आहोत असा भास झाला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातील स्वागत म्हणणाऱ्या विद्यार्थ्याने जणू 'रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक आमच्यापुढे उभे केले.

छान छान कविता वाचून दाखवल्या आणि आम्हांला म्हणायलाही लावल्या. त्या वेळी सर्व विद्यार्थी काव्यगायनात रंगून गेले होते. साऱ्यांनीच त्यांच्या या काव्यगायनाचे कौतुक केले. 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारी एक छोटी नाटिका इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यातील विनोदी संवादाने साऱ्यांचीच हसून हसून पुरेवाट झाली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन केले.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचन संस्कृती रूजवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामागचा हेतू होता की विद्यार्थ्यांनी कोणतेही एक पुस्तक वाचलेच पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांनी वाचलेले पुस्तक, त्यांना वाचनातून मिळालेला अनुभव व त्याविषयी त्यांचे मत याविषयी थोडक्यात सांगायचे होते. अनेकजणांनी आपल्या वाचनाचा आनंद खूप सविस्तरपणे मांडला.

आम्ही दहावीच्या विदयार्थ्यांनी आमच्या वर्गात विविध प्रकारच्या बालसाहित्याचे ऑनलाईन प्रदर्शन संगणक कक्षात भरवले होते. प्रत्यक्षात पुस्तके न मांडता संगणकावर इंटरनेटच्या साहाय्याने वेगवेगळी पुस्तके, साहित्य व वेबसाईट यांचे मार्गदर्शन यात करण्यात आले होते. शब्दकोश, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा, त्याची पिडिएफ स्वरूपातील आवृत्त्यांची प्रात्यक्षिके या ऑनलाईन प्रदर्शनातून देण्यात आली.

'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमासाठी लाभलेल्या या दिनानिमित्ताने आम्ही सुप्रसिद्ध लेखक व कवी श्री. अनंत भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यांनी आम्हांला कोणकोणती पुस्तके वाचावीत, ती कशी वाचावीत याबद्दल मार्गदर्शन केले. लेखक राहुल पुरोहित यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचा साधेपणा, त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व यांबद्दल सांगतानाच आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलो, तर जगण्याचा खरा आनंद घेऊ शकतो असा संदेश दिला. या साहित्यिकांचे अनुभव आम्हां साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरले.

मुख्याध्यापक श्री. शिर्के सरांनी कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेटक्या आयोजनाबद्दल कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून त्यांनी 'वाचन प्रेरणा दिन' हा केवळ एका दिवसासाठी नसून साऱ्यांनीच रोज काही ना काही वाचावे असे आवाहन केले. 

माझ्यासाठी प्रत्येक दिन हा वाचनदिन असतो. ‘दिसामाजी वाचावे काहीतरी’ या उक्तीप्रमाणे वाचनानंद मी रोजच घेत असतो. परंतु वाचन प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी हा दिन साजरा करायला मला आवडतो.

Concept: निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन ३ | Q इ. ३.
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×