Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Advertisement Remove all ads
Solution
- कवी - मोरोपंत
- 'भरतवाक्य' या रचनेतून कवी मोरोपंत आपल्याला चांगल्या माणसांच्या संगतीचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगत आहेत. आपण नेहमी सज्जन व्यक्ती, सत्कर्मे, सद्विचारांच्या सान्निध्यात रमावे, आत्मबोध करून घ्यावा, खोटा अहंकार त्यागावा, मोहाला बळी पडू नये असे आवाहन ते आपल्याला करतात. परमेश्वराच्या नामस्मरणात नेहमी तल्लीन राहावे अशी शिकवण ते देतात.
- मोरोपंतांची ही काव्यरचना सज्जन माणसांच्या सहवासाचे व चांगल्या विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सहज पटवून देते. कवितेत ओघवती, रसपूर्ण व सहजसोपी भाषा वापरल्यामुळे ही कविता श्लोकांसारखी गाता येते. 'भरतवाक्य' म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य. यांचा संदर्भ घेऊनच 'केकावली' मधील शेवटची पद्यरचना म्हणून मोरोपंतांनी या रचनेला 'भरतवाक्य' हे समर्पक नाव दिले असावे. मोरोपंतांनी या रचनेला संस्कृतप्रचुर शब्दांनी, अलंकारांनी सजवले आहे. 'सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो' ही रचनेची पहिली ओळ 'सुभाषित' म्हणून लोकप्रिय आहे. मोरोपंतांनी स्वत:ला मोर कल्पून, ईश्वराला जी आळवणी केली, तिला 'केकावली' म्हटले गेले हा संदर्भही फार मनोरंजक आहे. या सर्व कारणांमुळे मला ही कविता फार आवडते.
Concept: पद्य [इयत्ता १० वी]
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads