Sum
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.
`2/x - 3/y = 15; 8/x + 5/y = 77`
Advertisement Remove all ads
Solution
दिलेली एकसामयिक समीकरणे,
`2/x - 3/y = 15` ....(i)
`8/x + 5/y = 77` .....(ii)
समजा, `1/x` = p आणि `1/y` = q
∴ समीकरण (i) आणि (ii) पुढीलप्रमाणे होतील,
2p - 3q = 15 .....(iii)
8p + 5q = 77 ...(iv)
समीकरण (iii) ला 4 ने गुणून,
8p - 12q = 60 .....(v)
समीकरण (iv) मधून समीकरण (v) वजा करून,
8p + 5q = 77
8p - 12q = 60
- + -
17q = 17
∴ q = `17/17` = 1
q = 1 ही किंमत समीकरण (iii) मध्ये ठेवून,
2p - 3q = 15
2p - 3(1) = 15
∴ 2p - 3 = 15
∴ 2p = 15 + 3 = 18
∴ p = `18/2` = 9
∴ (p, q) = (9, 1)
p आणि q च्या किमती परत ठेवून,
`9 = 1/x` आणि `1 = 1/y`
∴ `x = 1/9` आणि y = 1
∴ (x, y) = `(1/9, 1)` ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरणांत रुपांतर करण्याजोगी समीकरणे (Equations reducible to a pair of linear equations in two variables)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads