Chart
Short Note
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
Advertisement Remove all ads
Solution
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | संपूर्ण पृथ्वी आपले एक कुटुंब मानणे, सर्वांना आपलेसे मानणे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणे हा या 'वसुधैव कुटुंबकम्'चा अर्थ आहे. |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | अक्षरी कुलुपामध्ये अक्षरे जमवून कुलूप उघडता येते. ज्या कुलुपांमध्ये अक्षरे नसतात अशा साध्या कुलुपांना अक्षरशत्रू कुलुपे असे म्हटले आहे. |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | कुलुपांचा शौक असणाऱ्या नानांनी चोऱ्यांना वैतागून लोहाराच्या मदतीने स्वत: अनोख्या प्रकारचे कुलूप बनवून घेतले. हे कुलूप किल्लीने लागणारे व हिसड्यासरशी उघडणारे होते. हा निव्वळ मूर्खपणा असूनदेखील नाना मात्र याला आपल्या कलेचा उत्तम नमुना समजत होते. त्यामुळे चोरी होणे साहजिकच होते. मात्र आपली पडती बाजू न स्वीकारता चोरच कलेला आश्रय देत नाहीत, असा आरोप ते चोरांवर करतात. |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला | बंडूनाना व इतर सर्व नाटकाला गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली; मात्र त्यांचे कुटुंब सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेल्यामुळे दागिने तेवढे बचावले. कुटुंबाच्या हौशीला दोष देणाऱ्या बंडूनानांना यावेळी मात्र कुटुंबाने टोमणा दिला, की माझ्या हौशीनेच मिळकतीचा बचाव केला. |
Concept: गद्य (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads