खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:
(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.
Solution
वारली चित्र परंपरेतील चित्र आहे. वारली चित्रकला- शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत झाला. या चित्र विषयी माहिती-
(अ) निसर्गाचे चित्रण:
या चित्रात काही वनस्पतींच्या फांदया, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली दिसतात.
(ब) मानवाकृतींचे रेखाटन:
चित्रात स्त्री-पुरुष, खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्र माणसांची हुबेहूब चित्र नसतात. ती फक्त रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यांच्या साहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात.
(क) व्यवसाय:
या चित्रात शेती करणारे स्त्री-पुरुष दिसत आहेत.
पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा.
(ड) घरे:
उतरत्या छपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात. झोपड्यांच्या भिंती कुडांच्या किंवा मातीच्या असाव्यात. त्यावर चित्रे काढलेली आहेत.
या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते. हे लोक गरीब आहेत, हे जाणवते. हे लोक जसे जगतात, त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात.