खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
Solution
गिरिजा कीर यांच्या 'तू सावित्री हो!' या बालकथासंग्रहातील आठ कथांपैकी 'गोष्ट एका माणसाची' या कथेतील 'मधू' हे परिस्थितीने गरीब असलेले पात्र आहे. त्याची आई आजारी पडल्यानंतर तिच्या उपचारासाठी पैसे मिळवण्यासाठी तो एका व्यक्तीचे पाकीट मारतो. या पाकिटात त्याना दोन हजार रुपयांबरोबर एक चिठ्ठी सापडते ज्यामुळे मधूला समजते, की आपण ज्याचे पाकीट मारले तोसुद्धा अडचणीत आहे.
मधू हा संवेदनशील मनाचा आहे. त्याच्यातील 'माणुसकी' अजूनही जिवंत आहे. त्याने केलेली कृती ही नाइलाजाने केलेली आहे. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्यासारख्याच अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्याकडे जाऊन आपल्या कृत्याची कबुली देण्याची हिंमत मधू दाखवतो.
संवेदनशील मन असलेला, सत्य बोलण्यास न घाबरणारा 'माणूस' म्हणून मला मधूशी मैत्री करायला आवडेल.