खालील दिलेली कृती सोडवा.
टिपा लिहा. (२)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
Solution
'बालसाहित्यिका – गिरिजा कीर' या पाठात लेखिका डॉ. विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे.
गिरिजा कीर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची अतिशय सुंदर चरित्रे लिहिली आहेत. 'थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरे स्मारक' असे त्यांचे मत आहे. या चरित्रांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक चरित्रातून त्या मुलांसमोर एकेक महत्त्वाचा विचार मांडतात. एखाद्या चरित्रनायकाचे किंवा चरित्रनायिकेचे नेमकेपणाने वर्णन करताकरता त्यातूनच त्या मुलांना एक प्रभावी संदेश देतात. त्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडवतात. मुलांना सहज समजेल, आवडेल अशा सोप्या; पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेत लेखन करून त्यांनी चरित्रलेखनाला विशिष्ट उंची प्राप्त करून दिली आहे.