काव्यसौंदर्य.
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Solution
'विंचू चावला' या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.
तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.