काव्यसौंदर्य.
'समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.'
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Solution
महानगरीय दुरवस्था नि घुसमट 'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांत चित्रित केली आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थेकूनभागून रेल्वे-फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते. बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो.
स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे, तिचा भावनिक ऱ्हास डोळ्यांदेखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली.