उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. पावडेकाका व रेखा मावशी यांच्या पावलांमधील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. (०२)
व्यक्ती | पावलांचा रंग | पावलांच्या रंगाचे कारण |
रेखा मावशी | ||
पावडेकाका |
“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत”, सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!” “खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळ मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले. |
२. आकृती पूर्ण करा. (०२)
३. स्वमत (०३)
तुमची शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना कराल ते तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
१.
व्यक्ती | पावलांचा रंग | पावलांच्या रंगाचे कारण |
रेखा मावशी | चंदेरी | रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वाव नाही. |
पावडेकाका | काळा | रोजच्या जीवनात कार्बन सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. |
२.
३. शाळा हे विद्येचे मंदिर असते. त्यामुळे, या ज्ञानदेवतेच्या मंदिरात स्वच्छता नांदणे तितकेच महत्त्वाचे असते. यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नशील राहणे आवश्यक ठरते. माझी शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याकरता मी शाळेतील कचरा व्यवस्थापनावर लक्ष पुरवेन. शाळे होणारा कचरा कचरापेटीतच टाकला जाईल याची दक्षता घेईन. शाळेचा परिसर प्रसन्न वाटावा याकरता शाळेच्या आवारात झाडे लावून त्यांची काळजी घेईन. झाडांच्या पानांचा वापर खत निर्मितीसाठी करून त्याचा वापर त्याच झाडांच्या वाढीसाठी करेन. शाळेचा अस्वच्छ परिसर सफाई कामगारांकडून स्वच्छ करून घेईन. शाळेत स्वच्छता शिबिर राबवण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापकांसमोर ठेवेन. शाळेतील वापरात नसलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावेन. त्याकरता शिक्षकांची परवानगी घेईन. अशाप्रकारे, शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता मी प्रयत्नशील राहीन.