का ते लिहा.
श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते.
Solution
श्यामच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांना नवीन कपडे वर्षा-दोन वर्षांनी मिळत असत. कपडे फाटले, तर गाबड्या (ठिगळ) जोडून वापरावे लागत. अशातच श्यामच्या लहान भावाने आईजवळ नवीन कपड्यांसाठी हट्ट धरला. त्यावेळी ”तुझे अण्णादादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील.“ असे सांगून आईने त्याची समजूत घातली. हे ऐकून श्यामने आपल्या लहान भावाचा हट्ट पुरवण्याचा निश्चय केला. वडील श्यामला वरचेवर जे खाऊसाठी पैसे देत ते त्याने खाऊसाठी खर्च न करता साठवण्यास सुरुवात केली. एक रुपया जमा केला. त्यात दोन वार कापड व अर्धा वार अस्तर विकत घेतले. शिंप्याकडून भावाच्या मापाचा एक छानसा कोट शिवून घेतला.
भावावरील प्रेमापोटी श्यामने सारे प्रयत्न केले होते. लहान भावाची इच्छा पूर्ण करू शकल्यामुळे, जेव्हा श्यामने तयार झालेला तो कोट हातात घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.