Advertisement Remove all ads

झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकट पूर्ण करा. (०२)

झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत

धारण करून तपश्चर्या करत...

पक्षी झाडांचे कुणीच नसतात

तरीही झाड त्यांचं असतं

मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते

झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब

झाडाकडे टक लावून पाहिलं तर

शरीरभर विरघळतो हिरवा रंग

रक्त होते क्षणभर हिरवेगार 

आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत

झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी

पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं

नव्या नवरीसारखं

झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी

अन झटकली जाते मरगळ

पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं

एक संथ गाणे दडलेले असते

हसावं कसं सळसळत्या पानासारखं

मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत

जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं

रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं!

२. चौकट पूर्ण करा. (०२)

 १. खालील गोष्टी पाहून कवीच्या मनात आलेले विचार लिहा.

अ. हिरवा रंग

आ. झाडांचे बाहु

 २. संकल्पना स्पष्ट करा. (०१)

   दव

३- शब्दांचे अर्थ

 १. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा. (०२)

  1. गाणे -
  2. झाड -
  3. नवरी -
  4. पक्षी -

४- काव्यसाैंदय

१. ‘अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’ या ओळीतील विचारसाैंदर्य सांगा. (०२)

Advertisement Remove all ads

Solution

१.

१. ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करणारे

२. मुळावर घाव घातला तरी मुकाट सहन करणारे

३. मुसाफिरांना कवेत घेण्यास सरसावणारे

४. पानझडीनंतर पुन्हा नव्या नवरीप्रमाणे नवे वस्त्र धारण करणारे

५. मनाची मरगळ दूर करणारे

६. घट्ट पाय रोवीत मुरणारे

७. रोजचं चिंतन करणारे

२. 

 १.

अ. पाहताक्षणी रक्त हिरवेगार होते व आयुष्य नुकताच खुडलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत होते.

आ. मुसाफिरांना कवेत घेण्याकरता सरसावलेले असतात.

२. वातावरणातील बाष्पाला थंड हवा लागताच त्याचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. त्याला दव असे म्हणतात. जेव्हा पानांचे रूपांतर कागदात होते तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू जणू अक्षरे बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात.

३.

  1. गीत
  2. वृक्ष, तरू
  3. वधू
  4. पाखरू, खग

४. 

१. वरील काव्यपंक्ती ही जॉर्ज लोपीस यांच्या 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, नेहमी सर्वांना भरभरून देत राहण्याचा दानीपणाचा गुण, कठीण प्रसंगांतही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे.

झाडांच्या अनेक परोपकारांपैकी आणखी एक परोपकार म्हणजे झाडांपासून होणारी कागदनिर्मिती. जेव्हा झाडाच्या पानांचे रूपांतर कागदात होते, तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू 'अक्षरे' बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात, अशी सुंदर कल्पना कवी येथे करत आहे. वास्तव अतिशय तरल शब्दांत कवीने येथे मांडले आहे.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 13 हिरवंगार झाडासारखं
स्वाध्याय | Q २. अ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×