खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.
Solution
प्रयत्नांती परमेश्वर |
तुकाराम नावाचा एक गरीब शेतकरी होता. त्याची जमीन कोरडवाहू होती. आपल्या कुटुंबापुरते कसेतरी उत्पन्न त्याला मिळत असे; मात्र शेतजमीन कोरडवाहू असल्यामुळे त्याने केलेल्या परिश्रमाचा मोबदला त्याला म्हणावा तसा मिळत नव्हता. पावसाची उशिरा सुरुवात व अपुरे प्रमाण यांमुळे त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळत नव्हते. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते. दारिद्र्याने पिचलेला तो गरीब शेतकरी पार हवालदिल झाला होता. एके दिवशी तुकारामने आपल्या मित्राकडून शेतीतल्या नव्या प्रयोगांबद्दल ऐकले. त्याने मनाशी निश्चय केला. आपणही प्रयोग करून पाहायचे. कठोर परिश्रम घ्यायचे आणि शक्य होतील तेवढे प्रयत्न करायचे. या नव्या प्रयोगामध्ये त्याने माती परीक्षण करून घेतले. त्यानुसार योग्य त्या पिकांची लागवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला. आपल्या शेतीच्या देखभालीकरता त्याने रात्रंदिवस कष्ट केले. याचा परिणाम म्हणजे त्याच्या उत्पन्नात भरभराट झाली. तुकारामचे नाव सर्वदूर पोहोचले. त्याला मिळालेल्या यशाने तो आनंदी झाला. त्याची शेती पाहण्याकरता जिल्ह्यातील अनेक शेतकरी त्याच्या शेतीला भेट देऊ लागले. तुकाराम अगदी आनंदाने आपल्या शेतीची इतर शेतकऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन करू लागला. त्याच्या शेतीतील कार्याची दखल शासनाने घेतली आणि अभिनव शेती पद्धतीचा राष्ट्रीय पुरस्कार तुकारामला जाहिर झाला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तात्पर्य: प्रयत्न करत राहिलो तर यश नक्कीच आपले होते. |