गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
Solution
माझ्या आठवणीतला सुंदर निसर्गानुभव म्हणजे भोपरच्या जंगलात पक्षी निरीक्षणातून मिळालेला अनुभव . मी आणि माझे मित्र आमच्या पक्षीनिरीक्षक दादासोबत पक्षीनिरीक्षण करण्याकरता गेलो होतो. जंगलात दिसणारे विविध प्रकारचे, विविधरंगी, वेगवेगळे आवाज करणारे पक्षी म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच ठरली. त्यातच एका विशिष्ट ठिकाणी आम्ही पोहोचलो, तेव्हा एक पक्षी स्वत:च्या आवाजाने आमचे लक्ष विचलित करत होता. आम्हांला स्वत:कडे आकर्षित करून त्या ठिकाणाहून दूर नेत होता. आमच्या दादाला त्यामागची गंमत समजली होती. या पक्ष्याची अंडी त्याच प्रदेशात असणार व आम्ही त्या अंड्यांपर्यंत पोहोचू नये, म्हणून तो पक्षी आम्हांला दूर नेऊ पाहत होता हे दादाच्या लक्षात आले. त्याने ती अंडी शोधून काढली. मग दुरूनच आम्ही ती लालसर पांढरी अंडी पाहिली व तेथून तात्काळ दूर निघालो. आपल्यामुळे त्या अंड्यांना धोका पोहोचू नये हा यामागील हेतू होता. आपल्या पिलांसाठी स्वत:ला धोक्यात टाकणाऱ्या या आईची ममता पाहून वेगळेच सुख मिळाले.