Advertisement Remove all ads

’गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माPया लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते“, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कोण ते लिहा. (०२)

अ) रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा – ______

ब) झर्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणार्या – ______

क) स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे – ______

ड) पायाची स्वच्छता बघणारा – ______

“गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत?

रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्ट्स...!” असं म्हणत त्यानं मोबाइलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्ट्स! दि मोस्ट क्लीन फूटप्रिन्ट्स!!'

“वाऽ पाह्यलंत रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्पटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “ह्याऽ हे भलतचं!” रेखामावशींच्या पाायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले.

सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिर्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?”

“त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत....!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया,” त्यांनी पुस्ती जोडली.

२. आकृती पूर्ण करा (०२)

अ)

आ)

३. स्वमत (०३)

जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटते ते तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisement Remove all ads

Solution

१.

अ) रेखा मावशींचा लेक

ब) रेखा मावशी

क) पावडेकाका

ड) फूटप्रिन्ट्स ॲप

२.

अ)

आ)

३. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या चुकांचा आता भस्मासूर बनून जागतिक तापमान वाढीच्या रूपात अवतरला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मागचा-पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमत: थांबवली पाहिजे. विषारी धूर सोडणार्या कारखान्यांवर नियंत्रण लावले पाहिजे. प्रदूषणाविषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणार्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला पाहिजे. याव्यतिरिक्त वातानुकूलित यंत्र, शीतकपाटे, परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. शिवाय, प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवून त्याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे, जागतिक तापमान वाढीचा प्रश्न सोडवता येणे शक्य होईल.

Concept: गद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 7 फूटप्रिन्टस
कृती क्रमांक:२ | Q १. अ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×