Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Distinguish Between
फरक स्पष्ट करा.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश
Advertisement Remove all ads
Solution
भारतीय मैदानी प्रदेश | ब्रझील मैदानी प्रदेश | |
1. | भारतीय मैदानी प्रदेश गंगेचे मैदान व गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा त्रिभुज प्रदेश या दोन प्रदेशांत विभागला गेला आहे. | ब्रझीलमध्ये मैदानी प्रदेश उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराना, पॅराग्वे नद्यांचा भाग या दोन विभागांत दिसून येतो. |
2. | उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा विस्तार हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, तसेच पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत आहे. | ॲमेझॉनचा मैदानी प्रदेश गियाना उच्चभूमी व ब्रझील उच्चभूमी दरम्यान आढळतो. |
3. | भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग आणि बांग्लादेश मिळून गंगा व ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. | ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय वर्षावने आहेत. पँटानल हा जगातील उष्णकटिंबधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. |
4. | या प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. | वारंवार येणारे पूल आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूप दुर्गम बनला आहे. |
Concept: भारताची प्राकृतिक रचना
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads