उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. चौकटी पूर्ण करा. (०२)
१. प्रत्येक कार्यक्रमात सन्मान म्हणून दिले जाते – ______
२. लेखक वाईला येथे राहत होते- ______
एकदा मी पु.ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाइर्नी मला थांबवले व विचारले, ’तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?“ मी एका पायावर 'हो' म्हटले. पु.ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्याखोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळया प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील 'पुलकित' शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन घेऊन मी आता 'शालीन' बनू लागलो आहे.” |
२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
३. स्वमत कृती (०३)
'शालीमुळे शालीनता जाते' विधान स्पष्ट करा.
Solution
१.
- शाल व श्रीफळ
- कृष्णा नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत.
२.
३. शाल हे सामान्यपणे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. एखाद्या व्यक्तीने केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल त्याचा गौरव करण्याकरता शाल भेट रूपाने दिली जाते. मानाच्या रूपात मिळणारी ही शाल मात्र काही वेळा मानवी स्वभावास गर्वाचा स्पर्श करवते. मिळणाऱ्या मान-सन्मानाने हुरळून जाऊन शालींनी नावाजलेली व्यक्ती आपल्या अंगी असणारी विनम्रता, शालीनता यांचा त्याग करते आणि गर्वाने फुगते. त्यामुळे, शालींमुळे शालीनता जाते हे एका अर्थी सत्य ठरते; मात्र प्रत्येक व्यक्तिबाबत असेच घडते असे नाही. अनेक मोठे मान-सन्मान मिळवणारे दिग्गज आजही आपली शालीनता सांभाळून असल्याची काही उदाहरणे आजही आहेत; पण हे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. 'शालीमुळे शालीनता जाते' या वाक्याात दडलेला सखोल अर्थ उलगडत लेखकाने अचूकपणे मानवी स्वभावदोषावर बोट ठेवलेले दिसून येते.