Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली, विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
Advertisement Remove all ads
Solution
सारांश्
अनेकजण 'आधी स्वार्थ मग परमार्थ' वृत्तीमुळे खऱ्या नात्यांपासून दुरावतात. सोय, सुख, विचार, भावनांना प्राधान्य देणारी नातीच जपली जातात. यामुळे, नात्यांत गुंतून त्यात पूर्णपणे सामावण्यापासून आपण दुरावतो. खऱ्या नात्यांतील संवेदनांचे पदर मनाच्या एकात्मतेतून उलगडतात.
Concept: सारांश लेखन
Is there an error in this question or solution?