Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
Advertisement Remove all ads
Solution 1
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत:
- भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.
- उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५° से ते ३०° से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५° से ते १०° से असते.
- भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.
- उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.
Solution 2
- भारताचे हवामान 'मान्सून' प्रकारचे आहे तरीदेखील भारतातील हवामानामध्ये विविधता दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे अक्षवृत्तीय स्थान व त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची हे होय.
- भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे, या भागाचे तापमान उष्ण दिसून येते.
- भारतातील उत्तरेकडील भाग हा समशीतोष्ण, तर दक्षिणेकडील भाग हा उष्ण कटिबंधीय हवामानाचा आहे. भारताच्या दक्षिण भागात उत्तर भागापेक्षा तापमान जास्त असते.
- तसेच, दक्षिण भारतातील पर्जन्यामध्येही आपणांस बदल दिसून येतो. केरळ राज्यास नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो, तर तमिळनाडू राज्यास ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस मिळतो.
- पश्चिम किनाऱ्यालगत असणाऱ्या पश्चिम घाटाकडून नैऋत्य मान्सून वारे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे, पश्चिम किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण अधिक दिसून येते, तर वातविन्मुख प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी दिसून येते.
- तसेच, अरवली पर्वतरांगा या बाष्पयुक्त वाऱ्यांना समांतर असल्याने गुजरात व राजस्थानमध्ये अवर्षणाची स्थिती दिसून येते.
- उत्तर व पूर्व हिमालय पर्वतरांगांच्या प्रदेशाची उंची समुद्रसपाटीपासून अधिक असल्याने या प्रदेशाचे तापमान अतिशय कमी दिसून येते. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरचे तापमान -४०° से पर्यंत कमी होते. उत्तरेकडील या प्रदेशात बर्फवृष्टीदेखील होताना दिसते. तसेच, हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
अशारीतीने, भारतामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे हवामानात बदल होताना दिसतात
Concept: भारतामधील हवामान
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads