दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.
शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.
Solution
वास्तव |
ऑनलाईन शिक्षणाचा सावळागोंधळ! विद्यार्थ्यांना वेध शाळा सुरू होण्याचे दि. ३ नोव्हेंबर २०२० वार्ताहर ठाणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केलेल्या शाळा सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन म्हणजेच संगणक किंवा मोबाइलवर सुरू आहे. खेड्यापाड्यांतील दुर्गम-अतिदुर्गम भागांतील गरीब विद्यार्थ्यांकरता आणि इंटरनेट सुविधा क्षीण असलेल्या काही ठिकाणी हे शिक्षण सुरू असूनही नसल्यासारखे आहे. शासनाने अभ्यासक्रमात केलेली २५% कपात पाहता शाळा सुरू न होताही अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दडपण शिक्षकांवर आहे. या मोबाइल शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नसल्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल किंवा संगणक शाळेतही सहभागी होता आले नाही त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असेल? अशा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटना विचारत आहेत. शासनाने योग्य असा निर्णय घेऊन ही कोंडी सोडवावी अशी विविध संघटनांची मागणी आहे. |