Advertisement Remove all ads

‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Answer in Brief

‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.

Advertisement Remove all ads

Solution

सीमेवर लढण्यासाठी जाणारा सैनिक 'देशसेवा हीच ईश्वरसेवा' या भावनेने देशसेवा करत असतो. कोणत्याही संकटाची पर्वा न करता, प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतो. अशा सैनिकांची प्रत्यक्षपणे मी काही मदत करू शकत नसलो तरीही माझ्या परिने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.

माझ्या मते, आपण प्रत्येकाने थोडेसे डोळसपणे पाहिल्यास, खबरदारी बाळगल्यास, देशाच्या संरक्षणाची थोडीशी जबाबदारी उचलल्यास सैनिकांवरील भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. देशाचे रक्षण ही आपली जबाबदारी असल्याची भावना मनात रुजणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना आपलेपणा वाटावा याकरता रक्षाबंधन, दिवाळी अशा सणांच्या वेळी राखी, फराळ, भेटवस्तू पाठवून त्यांच्याप्रतीच्या भावना, आदर व्यक्त करता येईल. सैनिकांकरता, त्यांच्या कुटुंबांकरता गोळा केल्या जाणाऱ्या फण्डसमध्ये शक्य तेवढी मदत करता येईल. अशारीतीने आपल्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांना थोडीशी मदत निश्चितपणे करता येईल.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×