छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
Solution
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र यातून आपल्याला त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या घेतलेल्या धोरणातील पुढील बाबी स्पष्ट होतात -
(१) पोर्तुगीज, डच, इंग्रज हे व्यापारी सावकारांप्रमाणे नसून; त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे.
(२) हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात येऊन जम बसवतात.
(३) युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत.
(४) म्हणून या व्यापाऱ्यांशी कामापुरताच संबंध ठेवावा.
(५) त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये.
(६) वखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल; तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यालगतची जागा देऊ नये.
(७) जागा दयायचीच झाली तर समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ दयावी.
(८) हे व्यापारी आपल्या आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदरांच्याजवळ त्यांना जागा देऊ नये.
(९) या व्यापाऱ्यांच्या मार्गात आपण आडवे जाऊ नये व त्यांनाही आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये.
(१०) शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा युरोपीय व्यापारी सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये.