खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
Solution
सारांश
धगधगत्या उन्हात पोपटी पालवी फुटलेली झाडे तेजपूर्ण हिरवीगार भासत आहेत. पिंपळाच्या झाडावरील लालसर हिरव्या रंगाच्या सळसळणाऱ्या पालवीने प्रत्येक डहाळी नटली आहे. उन्हाच्या तेजात न्हाऊन निघणारी ही चैत्रसंपदा म्हणजे डोळयांना, हृदयाला आनंद देणारा उत्सवच वाटतो.