Advertisement Remove all ads

ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

  1. नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते.
  2. विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खादय असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात, त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी, अशा प्रदेशांत मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.
  3. उदा., ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात.
  4. उदा., भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी आढळतात.
  5. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते, अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.
  6. उदा., ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागांत विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात.
  7. ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते, अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळतात.
  8. उदा., भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात. परिणामी या भागांत मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.
Concept: नैसर्गिक वनस्पती व प्राणी
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati भूगोल इयत्ता १० वी Social Science Geography 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium
Chapter 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 36
SCERT Maharashtra Question Bank भूगोल इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science Geography | Maharashtra State Board 2021 | Marathi Medium
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 3
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×