SSC (English Medium) Class 10th Board ExamMaharashtra State Board
Share
Notifications

View all notifications
Books Shortlist
Your shortlist is empty

माझ्या बालमित्रांनो , मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्या सारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो - SSC (English Medium) Class 10th Board Exam - Marathi (2nd Language)

Login
Create free account


      Forgot password?

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा

माझ्या बालमित्रांनो , मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्या सारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्या मध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्ली तील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्प मधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या , पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टं प तयार करणे व कुठून तरी जुन्या पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपरीयंत माझ्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या . दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा ! तिथेच झोप लागायची आणि जागं यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत.

(१) कारणे लिहा.  ०२
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्ह ते कारण ...........................
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण ..................................

(२) आकृती पूर्ण करा. ०२

(३) खालील शब्दांसाठी  उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) दीन

(ii) निद्रा

(iii) श्रम

(iv) हस्त

 

(४) स्व मत- लेखकाच्या बालपणीच्या आठवणींवरून त्यांच्या तील तुम्हाला जाणवलेल्या गुणवैशिष्ट्यांविषयी मत लिहा. ०२

 

Solution 1

(१) कारणे लिहा.
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्ह ते कारण ते त्यावेळी पोलीसखात्याच्या तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते.
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यां कडून धम्मकलाडू व व चापटपोळ्यां चा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण दिवसभर खेळून संध्या काळी घरी येईपर्यंत त्यांच्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या .

(२) आकृती पूर्ण करा.

(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा.
(i) दीन-गरीब

(ii) निद्रा -झोप

(iii) श्रम-कष्ट

(iv) हस्त -हात

(४) स्वमत-प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. 

Solution 2

(१) कारणे लिहा.
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्ह ते कारण ते त्यावेळी पोलीसखात्याच्या तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते.
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यां कडून धम्मकलाडू व व चापटपोळ्यां चा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण दिवसभर खेळून संध्या काळी घरी येईपर्यंत त्यांच्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या .

(२) आकृती पूर्ण करा.

(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा.
(i) दीन-गरीब

(ii) निद्रा -झोप

(iii) श्रम-कष्ट

(iv) हस्त -हात

(४) स्वमत-प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. 

  Is there an error in this question or solution?
Solution माझ्या बालमित्रांनो , मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्या सारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो Concept: बीज पेरले गेले.
S
View in app×