Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
भौगोलिक कारणे लिहा.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
Advertisement Remove all ads
Solution
- वाहतूक व दळणवळणांच्या सोयींचा विकास हा कुठल्याही देशाच्या समतोल आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची एक मूलभूत गरज असते.
- वाहतूक व्यवस्था ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे प्रवाशांची ने-आण, मालाची वाहतूक करता येते.
- रस्ते व रेल्वे वाहतुकीने दूरवरील ठिकाणे जोडली जातात.
- जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने जलमार्गाचा उपयोग होतो.
- हवाईमार्गही आंतरराष्ट्रीय व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
- परिणामी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मालांच्या वाहतुकीमुळे परकीय चलन मिळण्यास मदत होते. हे देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरते.
- एकंदरीत, देशातील वाहतुकीमुळे आर्थिक उलाढाली व सांस्कृतिक देवाणघेवाण जलद गतीने होत असल्याने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
Concept: भारतातील वाहतूक
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads