Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
भारत आणि ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
Advertisement Remove all ads
Solution
- भारत आणि ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते.
- २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.२ टक्के होते. याउलट २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.
- १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत १८ टक्क्यांपासून ३१.२ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
- भारताप्रमाणेच, १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही ४७.१ टक्क्यांपासून ८४.६ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
- भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते.
- भारतात १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी-अधिक असल्याचे आढळून येते.
- ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली.
- परंतु, ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो.
Concept: भारत-नागरीकरण
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads