बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल?

Advertisements

Solution

P व R केंद्रबिंदू असलेली बाह्यस्पर्शी वर्तुळे परस्परांना O बिंदूत स्पर्श करतात.

येथे, PQ = 5.5 सेमी, QR = 4.2 सेमी

दोन्ही वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत.

∴ स्पर्शवर्तुळाच्या प्रमेयानुसार,

P-Q-R  

PR = PQ + QR ....[बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते.]

= 5.5 + 4.2 = 9.7 सेमी

∴ दिलेल्या वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर 9.7 सेमी आहे. 

Concept: स्पर्शवर्तुळांचे प्रमेय
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: वर्तुळ - सरावसंच 3.2 [Page 58]

RELATED QUESTIONS

दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती आहे?


प्रत्येकी 3 सेमी त्रिज्येची, केंद्र A, B व C असणारी तीन वर्तुळे अशी काढा, की प्रत्येक वर्तुळ इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल.


सोबतच्या आकृतीत, केंद्र C असलेेले वर्तुळ केंद्र D असलेल्या वर्तुळाला बिंदू E मध्ये आतून स्पर्श करते. बिंदू D हा आतील वर्तुळावर आहे. बाहेरील वर्तुळाची जीवा EB ही आतील वर्तुळाला बिंदू A मध्ये छेदते. तर सिद्ध करा, की रेख EA ≅ रेख AB.


सोबतच्या आकृतीत, केंद्र X आणि Y असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये स्पर्श करतात. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर सिद्ध करा,

त्रिज्या XA || त्रिज्या YB

खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून पूर्ण सिद्धता लिहून काढा.

 

रचना : रेख XZ आणि YZ काढा.

सिद्धता : स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार, बिंदू X, Z, Y हे  `square`

∴ ∠XZA ≅ `square` ............[विरुद्ध कोन]

∠XZA = ∠BZY = p मानू ............ (i)

आता, रेख XA ≅ रेख XZ ...........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ ∠XAZ = `square` = p ............ (ii) (समद्‌विभुज त्रिकोणाचे प्रमेय)

तसेच रेख YB ≅ YZ ..................[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ ∠BZY = `square` = p (iii) [समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

∴ (i), (ii) व (iii) वरून,

∠XAZ = `square`

∴ त्रिज्या XA || त्रिज्या YB ................[`square`]


Share
Notifications      Forgot password?
Use app×