Advertisement Remove all ads

’अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

१. आकृती पूर्ण करा. (०२)

“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?”

“सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळाव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळावा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! 'एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा', रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं ... पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या... माती धूळा बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले.

“मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो”, सुमितनं सांगितलं.

“सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळयांत भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरला की काय तुम्ही लोक?” बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली.

“मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्ट्स”, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला.

२.

अ) आकृती पूर्ण करा. (०१)

आ) एका वाक्यात उत्तर लिहा. (०१)

सुमितने तयार केलेले ॲप कोणते?

३. स्वमत (०३)

तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा.

Advertisement Remove all ads

Solution

१.

 

२.

अ)

 

आ) फुटप्रिन्ट्स हे सुमितने तयार केलेले ॲप होते.

३. माझ्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी म्हणजेच मीना मावशी जणू आमच्या घरातील एक सदस्यच. अनेक वर्षांचं विश्वासाचं नातं आहे आमच्यात. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही निश्चिंत असतो. त्या मात्र प्रामाणिकपणे सातत्याने कामात गढलेल्या असतात. पतीच्या निधनानंतरही साऱ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी मीना मावशी आपल्या मुलांच्या बरोबरीने स्वत:ही रात्रशाळेत शिक्षण घेते. मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ती सतत धडपडते. आम्ही आमच्याकडचे दिलेले ज्यादाचे सामान ती फक्त स्वत:पुरते राखून ठेवत नाही, तर वस्तीतल्या इतर गरजूंनाही ती ते पुरवते. मीना मावशी कडक शिस्तीची आणि स्वाभिमानीही आहे. आपल्या तत्त्वांशी ती कधीही तडजोड करत नाही. त्यामुळे, आम्हांला तिचा खूप अभिमान वाटतो.

Concept: गद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 7 फूटप्रिन्टस
कृती क्रमांक:१ | Q १. अ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×