ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.
Solution
ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे दोन प्रकार पडतात :
(1) ऑक्सिडीकरण (2) क्षपण.
(1) ऑक्सिडीकरणाची उदाहरणे :
(i) जेव्हा कार्बनचे ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन होते, तेव्हा कार्बन डायऑक्साइड तयार होते. या अभिक्रियेत कार्बन हा ऑक्सिजन स्वीकारतो, म्हणून ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.
\[\ce{C_{(s)} + O2_{(g)} -> CO2_{(g)}}\]
(ii) सोडिअमची एथिल अल्कोहोलबरोबर अभिक्रिया केली असता, सोडिअम एथॉक्साइड व हायड्रोजन वायू तयार होतो. या अभिक्रियेत एथिल अल्कोहोलमधील हायड्रोजन निघून जातो, म्हणून ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे.
\[\ce{\underset{\text{एथिल अल्कोहोल}}{2C2H5OH_{(l)}} + \underset{\text{सोडियम}}{2Na} -> \underset{\text{सोडियम एथॉक्साइड}}{2C2H5ONa} + \underset{\text{हायड्रोजन}}{H2↑}}\]
(iii) एथिल अल्कोहोलचे आम्लयुक्त पोटॅशिअम डायक्रोमेटच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण होते व ॲसेटिक ॲसिड हे उत्पादित तयार होते.
\[\ce{\underset{\text{एथिल अल्कोहोल}}{CH3 - CH2 -}OH \frac{2[O]}{K2Cr2O7/H2SO4}\underset{\text{ॲसेटिक ॲसिड}}{CH3 - COOH}+ H2O}\]
(2) क्षपण क्रियेची उदाहरणे :
(i) जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साइडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित करतात, तेव्हा गुलाबीसर तपकिरी रंगाचे कॉपर तयार होते. या अभिक्रियेत कॉपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन निघून जातो.
\[\ce{\underset{\text{कॉपर ऑक्साइड}}{CuO_{(s)}} + H2_{(g)} -> Cu_{(s)} + H2O_{(l)}}\]
(ii) हायड्रोजन वायू, तापलेल्या लाल कोळशावरून प्रवाहित केला असता, मिथेन वायू तयार होतो. या अभिक्रियेत, कार्बन हा हायड्रोजन स्वीकारतो, म्हणून ही क्षपण अभिक्रिया आहे.
\[\ce{\underset{\text{कार्बन}}{C_{(s)}} + \underset{हाइड्रोजन}{2H2_{(g)}} ->\underset{\text{मीथेन}}{CH4_{(g)}}}\]