Advertisement Remove all ads

अपठित गद्य प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (१) कोण ते लिहा. (I) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Answer in Brief

अपठित गद्य

प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -

(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -

(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -

जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून  शिकण्यासाठी बाहेर जायला  हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’

(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.

(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.


(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisement Remove all ads

Solution 1

(१)
(i) जलालुद्दीन 
(ii) एस. टी. आर माणिकन्
(iii) अब्दुल कलाम
(iv) शमसुद्दीन

(2) 
(i) १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई.

(3)

विशेषण विशेष्य
लोकप्रिय वृत्तपत्र
दुसरे महायुद्ध
नवे शोध
दूरचा भाऊ

(4) मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणिल्याने. आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.

Solution 2

(१)
(i) जलालुद्दीन 
(ii) एस. टी. आर माणिकन्
(iii) अब्दुल कलाम
(iv) शमसुद्दीन

(2) 
(i) १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई.

(3)

विशेषण विशेष्य
लोकप्रिय वृत्तपत्र
दुसरे महायुद्ध
नवे शोध
दूरचा भाऊ

(4) मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणिल्याने. आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.

Concept: गद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×