Advertisement Remove all ads

अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।१।। तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।२।। सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं।।३।। भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन  -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

 १. 'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)

Advertisement Remove all ads

Solution

१.

अ) बाळ

ब) गाय

२.

३.

१. धरती, भूमी

२. जंगल, रान

३. ढग

४. कामास

४.  'अंकिला मी दास तुझा' या अभंगात संत नामदेवांनी आई व बाळाच्या उदाहरणाद्वारे आपले व परमेश्वराचे नाते सांगितले आहे. आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची दयाळू, प्रेमळ आई धाव घेते, तसा तू माझ्यासाठी धाव घेतोस. मी तुला शरण आलेला दास आहे, असा भाव संतकवी नामदेव विठ्ठलाजवळ व्यक्त करत आहेत. आई-बाळाच्या उदाहरणाद्वारे कवीची परमेश्वर भेटीची तीव्रता, कळकळ व्यक्त होते. भक्ती, प्रेम, विरह, व्याकुळता अशा सर्व भावभावना उत्कटपणे येथे व्यक्त झाल्या आहेत. आई-मुलाच्या नात्यातील प्रेम कवी स्वत:च्या व भगवंताच्या नात्यात शोधू पाहतो. नि:स्वार्थ भावनेने मुलाला अखंड जपणारी आई ज्याप्रमाणे मुलाला संकटापासून दूर करते त्याचप्रमाणे माझी विठूमाऊली माझ्यासाठी नेहमीच धावत येते. या उत्कट प्रेमानेच मला परमेश्वराचा दास केले आहे. असा परमेश्वरावरील अपार प्रेमभाव व अतूट श्रद्धा नामदेवांनी येथे व्यक्त केली आहे.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 2.1 संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा
स्वाध्याय | Q २. अ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×