अभिव्यक्ती.
शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
Solution
'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रथित केले आहे.
किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचचउंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे. दुसरीकडे एक, दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे, हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो.
अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे.