Maharashtra State BoardHSC Arts 12th Board Exam
Advertisement Remove all ads

अभिव्यक्ती. ‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा. - Marathi

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

अभिव्यक्ती.

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते.
खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.11 आरशातली स्त्री
कृती (६) | Q 1 | Page 53
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×