एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
Solution
अनूच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता, स्वत: स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. अनू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही; तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते, हे अनूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार.